Hindu Sammelan : श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात येत्या (ता. १५) मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’ (Hindu Sammelan) आयोजित करण्यात आले आहे. संत श्री शेख महंमद महाराज मंदिर (Saint Shri Sheikh Mohammed Maharaj Temple) प्रांगणात सायंकाळी ६ वाजता हे संमेलन होणार आहे. या संमेलनात श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज (Ramgiriji Maharaj) उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
नक्की वाचा : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली
शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार
संमेलनानिमित्त दुपारी ४ वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कलिका माता मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात होईल. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत ही यात्रा संत श्री शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात पोहोचेल, जिथे मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आपसातील जातीभेद विसरून हिंदू परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. देशभक्त आणि आदर्श नागरिक घडवून भारतमातेला वैभवाच्या शिखरावर विराजमान करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन (Hindu Sammelan)
या संमेलनासाठी ह.भ.प. भूषण महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे हे विचार मांडणार आहेत. यावेळी ह.भ.प. विठ्ठल महाराज खेडकर, नगरसेविका मीराताई शिंदे, सुनील अनभुले, शिवाजी साळुंके, कालिदास कोथिंबीरे, प्रतीक पाचपुते, सागर गोरे, आदित्य अनवणे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व माता-भगिनी, भाविक आणि वारकरी संप्रदायाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे.



