Hindu Temple Demolition : नगर : दिल्ली येथील आरएसएस कार्यालयाच्या (RSS Office) पार्किंगच्या जागेसाठी झंडेवालान मंदिर दरगाह श्री पीर रतन नाथ महाराज यांच्या प्राचीन हिंदू धार्मिक स्थळावर बुलडोझर चालविल्या (Hindu Temple Demolition) प्रकरणी अहिल्यानगर येथे निषेध व्यक्त करण्यात आला. ही नाथांची जागा असून ती हिंदू धर्म (Hinduism) म्हणविणाऱ्यानी परत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील पंजाबी, शीख, सिंधी व इतर समाजाचे सेवेकरी आक्रमक झाले होते.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
समजातील नागरिक, महिला मोठ्या संख्यने उपस्थित
गुरवारी (ता. ४) सकाळी गोविदपुरा येथील मंदिर दरगाह बाबा श्री पीर रतननाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या संख्यने जमलेल्या नागरिकांनी निषेध केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनिता सहानी, गौतम अरोरा, शशी आनंद, शोभा खन्ना, रूपा पंजाबी, हेमा लोंगाणी, जनक अहुजा, बलदेव वाही, प्रितपाल धुप्पड, हरजितसिंग वधवा, सतिंदर नारंग, अनिल साबलोक व संजय गाडे आदींसह मोठ्या संख्यने पंजाबी, शीख समजतील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी (Hindu Temple Demolition)
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत. जे नामुमकीन होते असे अयोध्येतील श्रीराम मंदिर त्यांनी बनवून दाखवले. पण दिल्लीतील श्री पीर रतननाथ महाराजांचे मंदिर त्यांच्याच राज्यात उध्वस्थ करण्यात आले आहे. ही निंदनीय घटना आहे. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने श्री पीर रतन नाथ महाराजांचे पुराणात मंदिराची जागा परत द्यावी, व तेथे आमचे श्रद्धास्थान असलेले मंदिर पुन्हा उभारावे.
विकी सहानी म्हणाले, जे मंदिर हजारो वर्षापासूनचे पुरातन असून गुरु गोरखनाथ यांची गादी हे मंदिर चालवत आहे. हिंदू राष्ट्रात हिंदू मंदिरावर या प्रकारे बुलडोझर चालवणे अत्यंत लज्जास्पद घटना आहे. याच मंदिराचे अवशेष असलेले मुस्लीम राष्ट्र अफगाणिस्तानमध्ये असलेले मंदिर आजही सुरक्षित आहे, पण केवळ या मंदिराच्या पुढे दरगाह हे नाव लावत असल्याने दिल्लीतील आमचे श्रद्धास्थान सुरक्षित नाहीये. योगी आदित्यनाथ हे ज्या गोरक्षनाथांचे शिष्य आहेत त्याचीच गादी या मंदितारात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी यांनी आमच्या मंदिराची जागा परत आम्हला द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.



