Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

0
Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी
Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

Hinjwadi Bus Fire : अहिल्यानगर : हिंजवडीमध्ये आयटी हब कर्मचारी जळीत कांडाने (Hinjwadi Bus Fire) पुणे (Pune) पुन्हा एकदा हादरले आहे. चालकाचा दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असताना मजुरांची कामे सांगितली जात होती. त्याचा बदला घेण्यासाठी टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने गाडीला आग लावली. मात्र, यामध्ये त्याचा राग असलेले लोक बचावले असून निष्पापांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून

कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स दिली पेटवून

पुणे जिल्ह्यातील हिंजवडीमध्ये आयटी हब कर्मचारी जळीत कांडाने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. जळीत कांडाची घटना घडल्यानंतर पोलिसांना चालकाचा संशय आला होता. पोलिसांच्या तपासात त्याचे कुकर्म उजेडात आले आहे. चालकाच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी
Hinjwadi Bus Fire : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड

कंपनीतील तिघांवर होता राग (Hinjwadi Bus Fire)

पोलिसांनी चालकाची कसून चौकशी केली. त्यानंतर या घटनेमागचं कारण समोर आलेलं आहे. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली होती. कंपनी व्यवस्थापनाने चालकाता दिवाळीत पगार कापला होता. त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती. व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, असं त्याचं म्हणणं होतं. तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नव्हता. या कारणांमुळे चालक जनार्धन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने हा कट रचला होता.