Holi : राहाता : शहरातील गणपती चौकात शहराच्या वतीने परंपरेनुसार दरवर्षी वीरभद्र ट्रस्ट सार्वजनिक होळीचे (Holi) आयोजन करत असते. शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांच्या (Mayor) हस्ते ही मानाची होळी गेल्या कित्येक वर्षापासून पेटवली जात आहे. परंतु यावर्षी त्यात खंड पडला. होलिका दहनाच्या पवित्र आणि धार्मिक वातावरणात यंदा शहरात एक अनपेक्षित घटना घडली आणि शहराच्या राजकीय-सामाजिक (Political-Social) वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. वर्षानुवर्षे जपली गेलेली परंपरा मोडली गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि प्रश्नचिन्हांचे सावट निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात
कारण अद्याप गुलदस्त्यात
शहराची मानाची होळी पेटवण्यासाठी यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित दिसले नाहीत. कारण मात्र गुलदस्त्यात असल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. खात्रीलायक माहितीनुसार, विरभद्र देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना औपचारिक निमंत्रणच देण्यात आले नाही. आजवर कधीही न घडलेली ही घटना नेमकी यंदाच का घडली? ज्या नगराध्यक्षांना संपूर्ण शहराने विश्वासाने, भरभरून मतांनी निवडून दिले, त्यांनाच या धार्मिक परंपरेपासून दूर ठेवण्यामागे नेमकं कारण काय? हा केवळ निमंत्रणाचा प्रश्न आहे का, की यामागे काही राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद दडलेले आहेत? राजकारणात धर्म की धर्मात राजकारण? असा सवाल आता उघडपणे केला जात आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
धर्म हा एकत्र आणण्यासाठी असतो तो विभागण्यासाठी नसतो (Holi)
हा मुद्दा केवळ एका कार्यक्रमाचा नाही; तो लोकशाहीने निवडलेल्या प्रतिनिधींच्या सन्मानाशी निगडित आहे. सामाजिक सलोखा, परंपरा आणि लोकशाही मूल्ये यांचा समतोल राखला गेला पाहिजे, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. धर्म हा एकत्र आणण्यासाठी असतो तो विभागण्यासाठी नसतो, अशी भूमिका अनेकांनी मांडली.



