Holi Fest : ‘२०२४ होली फेस्ट’ रंगारंग कार्यक्रमाचे रविवारी आयोजन

Holi Fest : '२०२४ होली फेस्ट' रंगारंग कार्यक्रमाचे रविवारी आयोजन

0
Holi fest

Holi Fest : नगर : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आऊट ऑफ द बॉक्स इव्हेंटस (Events) आयोजित ‘२०२४ होली फेस्ट’ (Holi Fest) या रंगारंग कार्यक्रमाचे (Colorful program) नगर-पुणे रस्त्यावरील शिल्पा गार्डन येथे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता सुरू होईल.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

होळी खेळण्यासाठी नैसर्गिक कोरडा रंग मोफत उपलब्ध

या कार्यक्रमात कुटुंब व मित्रमंडळींना सहभागी होता येईल. प्रसिद्ध होस्ट करण कपूर हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. या कार्यक्रमात डी.जे. डेव, डी.जे. आर्ट व डी.जे. रॉबिन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत. कार्यक्रमात उत्कृष्ट डीजे कलाकार आपली कला सादर करतील. होळी खेळण्यासाठी नैसर्गिक कोरडा रंग मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Holi fest

नक्की वाचा : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

अशी असणार स्पेशल व्यवस्था (Holi Fest)

या शिवाय उत्कृष्ट व स्वादिष्ट जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. व्हीआयपी व्यक्तींसाठी वेगळी लक्झेरियस व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमातील छायाचित्रे त्वरित उपलब्ध करून देण्यात येतील. या कार्यक्रमासाठी एका व्यक्तीला २९९ तर दोघांना ३९९ रुपये शुल्क ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ‘रिवोल्ट’ मुख्य प्रायोजक आहे. तर अॅडव्हरटाईजमेंट पार्टनर ‘आय लव्ह नगर’ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९४०३७७०००५.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here