Home Voting : नगर : नगर शहर मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) गुरुवार (ता.१४) पासून गृह मतदानास (Home Voting) (होम वोटिंग) सुरूवात झाली. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी उपाययोजना
सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अवश्य वाचा : डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ : संग्राम जगताप
१४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार (Home Voting)
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदानाच्या पहिल्या दिवशी अकोले विधानसभा मतदारसंघात २५५ पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १६ दिव्यांग असे एकूण १४९ मतदारांनी गृहमतदान केले. संगमनेर मतदारसंघात २५२ पैकी ९८ ज्येष्ठ नागरिक, २४ दिव्यांग असे एकूण १२२, शिर्डी मतदारसंघात १९८ पैकी ८५ ज्येष्ठ नागरिक, १३ दिव्यांग असे एकूण ९८, कोपरगाव मतदारसंघात २१८ पैकी ७७ ज्येष्ठ नागरिक, २२ दिव्यांग असे एकूण ९९, श्रीरामपूर मतदारसंघात ७० पैकी ५९ ज्येष्ठ नागरिक, ८ दिव्यांग असे एकूण ६७, नेवासा मतदारसंघात १९४ पैकी १३६ ज्येष्ठ नागरिक, २१ दिव्यांग असे एकूण १५७, राहूरी मतदारसंघात १४४ पैकी ६३ ज्येष्ठ नागरिक, १२ दिव्यांग असे एकूण ७५, पारनेर मतदारसंघात २३८ पैकी ८२ ज्येष्ठ नागरिक, ९ दिव्यांग असे एकूण ९१, कर्जत – जामखेड मतदारसंघात ३१० पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १५ दिव्यांग असे एकूण १४८ मतदारांनी गृह मतदान केले.
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गृह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.