Home Voting : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत

Home Voting : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत

0
Home Voting : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत
Home Voting : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत

Home Voting : नगर : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे गृह मतदानासाठी (Home Voting) गेलेल्या मतदान पथकाचे रांगोळी काढून व फुले देऊन स्वागत करण्यात आले. मतदाराच्या (Voter) कुटुंबियांनी केलेल्या या स्वागताने हे पथक भारावून गेले. ‘सकाळी झालेल्या स्वागताने दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळाली’ अशी भावना मतदान (Voting) पथकाने व्यक्त केली.

नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

मतदान पथकातील सदस्यांचे फुले देऊन स्वागत

संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथे वसुंधरा कृष्णराव डांगे (वय:८८) या ८५ वर्षावरील मतदाराच्या गृह मतदानासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे पथक सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना सुखद अनुभव आला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदान पथकाच्या स्वागतासाठी मतदाराच्या कुटुंबाने रांगोळ्या काढल्या होत्या. मतदान पथकातील सदस्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले.

अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत

अधिकारी-कर्मचारी यांचे सहर्ष स्वागत (Home Voting)

‘पंढरीची वारी करी वारकरी, त्याच श्रद्धेने राष्ट्रीय कर्तव्य भावनेने मतदानाची करू तयारी’, ‘निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे सहर्ष स्वागत आणि आभार” अशा आशयाच्या सुंदर रांगोळ्या दारापुढे रेखाटण्यात आल्या होत्या. या पथकात मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र ढमक, मतदान अधिकारी राजेंद्र मालुंजकर, सूक्ष्म निरीक्षक संतोष लांघी, पोलीस कर्मचारी बंडू टोपे, व्हिडिओग्राफर सुनील गायकवाड यांचा समावेश होता. निवडणुकीच्या काळात हा सुखद आणि स्मरणीय अनुभव असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.