Homeless : कोपरगाव: तालुक्यातील मुर्शतपूर शिवारातील इरिगेशनच्या (Irrigation) जागेत तीन पिढ्यांपासून राहत असलेल्या ४० कुटुंबाच्या अतिक्रमीत घरावर अखेर अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला. या कारवाईमुळे तब्बल ४० कुटुंब बेघर (Homeless) झाले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस (Police) संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण (Encroachment) काढण्यात आले आहेत.
अवश्य वाचा : श्रीगोंदेतून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण
बेघर कुटुंबियांचे डोळे पाणावले
आपली घरे वाचविण्यासाठी या नागरिकांनी अनेकदा आंदोलने, उपोषणे केली. मात्र तरीही त्यांच्या पदरी निराशा पडली. हे अतिक्रमण काढताना रहिवाशांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. यावेळी काबाडकष्ट करून बांधलेले घरे जमीनदोस्त होताना पाहून बेघर झालेल्या कुटुंबियांचे डोळे पाणावले होते. हे अतिक्रमण काढू नये, तसेच आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी या बेघर झालेल्या लोकांनी केली.
नक्की वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण (Homeless)
तहसील, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढले आहे. आम्हाला आमदार आशुतोष काळे यांनी दोन एकर जागा कायमस्वरूपी राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून आमच्या घरकूलासाठीही ते पाठपुरवठा करणार असल्याची माहिती यावेळी बेघर झालेल्या नागरिकांनी दिली.