Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल 

Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल 

0
Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल 
Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल 

Honey Trap : अकोले: संगमनेर येथील एका व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात (Honey Trap) अडकवून ८४ हजार रुपये लुटणाऱ्या महिलेस अकोले पोलिसांनी (Police) पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल (Crime Filed) केला आहे.

नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

याबाबत संगमनेर येथील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. सदर तरुणाची दोन महिन्यांपूर्वी (२९ जून, २०२५) संगमनेर येथील एका महिलेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. पुढे हे दोघे लॉजवर भेटले. सदर महिलेने या तरुणास अकोले येथील एका महिलेचा मोबाइल नंबर दिला. सदर तरुणाने या महिलेला संपर्क केल्यानंतर तिने दुसऱ्या तरुणीच्या माध्यमातून त्याला देवठाण रोडवरील खडी क्रेशरवर बोलून एका खोलीत नेले. तेथे सदर तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याला एक लाखाची मागणी केली. यावेळी तरुणाने प्रथम सात हजार रुपये रोख व फोन पे वरून आठ हजार देऊन सुटका करून घेतली.

अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी

महिलेचा पैशांसाठी तगादा (Honey Trap)

पुढे महिलेचा पैशांसाठी तगादा, धमकी सुरूच राहिली. नंतर त्याच्याकडून ८४ हजार रुपये घेतले. शेवटी २९ ऑगस्टला फसविल्या गेलेल्या तरुणाने अकोले पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचला आणि तरुणाकडे पैसे देऊन सदर महिलेस पैसे देण्यासाठी बोलाविले. यावेळी तिला रंगेहाथ ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांना नोटीस देऊन तात्पुरते सोडून दिले आहे. मात्र, या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.