Hou De Dhingana:’होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व लवकरच होणार सुरु,सिद्धार्थ जाधव घालणार धिंगाणा

0
Hou De Dhingana:'होऊ दे धिंगाणा'चं तिसरं पर्व लवकरच होणार सुरु,सिद्धार्थ जाधव घालणार धिंगाणा
Hou De Dhingana:'होऊ दे धिंगाणा'चं तिसरं पर्व लवकरच होणार सुरु,सिद्धार्थ जाधव घालणार धिंगाणा

Hou De Dhingana : स्टार प्रवाह वाहिनी मागील चार वर्षांपासून फक्त प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. याच स्टार प्रवाह वाहिनीचा (Star Pravah) लोकप्रिय कार्यक्रम आता ‘होऊ दे धिंगाणा’चं (Hou De Dhingana) तिसरं पर्व (Season 3) १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे.

नक्की वाचा : ‘वनवास’चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर,’या’ दिवशी झळकणार सिनेमागृहात

‘होऊ दे धिंगाणा’मध्ये नेमकं काय ?(Hou De Dhingana)

‘होऊ दे धिंगाणा’ च्या तिसऱ्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे यंदा धिंगाणा रंगणार आहे. गावामध्ये अर्थात मुक्काम पोस्ट धिंगाणा बुद्रुकमध्ये. धिंगाणाच्या मंचावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी येतात. त्यामुळे तिसऱ्या पर्वात धमाल-मस्तीसोबतच महाराष्ट्राच्या मातीतली विविधता नवनव्या टास्कच्या माध्यमातून धिंगाणाच्या मंचावर अनुभवता येणार आहे. मागील पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखील असणार आहेत.

अवश्य वाचा : विधानसभेमुळे पोलिसांच्या सुट्ट्या,रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द!
सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं नवं रुप या पर्वात पाहायला मिळेल. स्टार प्रवाहच्या परिवारातल्या कलाकार मंडळींसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. दोन मालिकांच्या टीममधील सांगीतिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच. त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमती ही या मंचावर उलगडतील.

सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?(Hou De Dhingana)

अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. आता होऊ दे धिंगाणाने टीआरपीचे नवनवे विक्रम रचले होते. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरु होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. यंदाचा धिंगाणा हा तुमच्या आमच्या गावामध्ये नेणारा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here