Hoy Maharaja Teaser: ‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'होय महाराजा' च्या रूपात प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहे.

0
Hoy Maharaja Teaser
Hoy Maharaja Teaser

नगर :  नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिट बारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. आता असाच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘होय महाराजा’ (Hoy Maharaja) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित (Teaser Realese) करण्यात आला आहे. ‘होय महाराजा’ चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

नक्की वाचा : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

‘होय महाराजा’ चं दिग्दर्शन केले शैलेश एल. एस. शेट्टी यांनी (Hoy Maharaja Teaser)

एल एम एस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली बनणाऱ्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. ‘होय महाराजा’ च्या रूपात प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रथमेशची जोडी अभिनेत्री अंकिता ए. लांडे सोबत बनली आहे. याखेरीज अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी कलाकारांचाही या चित्रपटात समावेश आहे. 

अवश्य वाचा : ‘देशात माेदी आणि याेगी यांच्या कणखर भूमिकेमुळे हिंदू धर्माचे रक्षण’

क्राईम-कॅामेडी असलेल्या ‘होय महाराजा’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची झलक टीझरमध्ये दिसते. एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटात प्रेम कथेतील आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहायला मिळणार आहे. एका रोमांचक प्रेम कहाणीला प्रासंगिक विनोद आणि सुरेल गीत-संगीताची सुरेख किनार जोडण्यात आली आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावताना हा चित्रपट अंतर्मुखही करेल असे मत दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

 ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार चित्रपट  (Hoy Maharaja Teaser)

संचित बेद्रे यांनी ‘होय महाराजा’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गुरु ठाकूरच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना चिनार-महेश या संगीतकार दुकलीनं संगीतबद्ध केल्या आहेत. अमेया नरे, साजन पटेल यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, कोरिओग्राफर फुलवा खामकरने नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी वासुदेव राणे यांनी केली असून, निलेश नवनाथ गावंड यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे, तर अॅक्शन दिग्दर्शन फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी केलं आहे. वेशभूषा जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here