HSC Board Exam | नगर : राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२वीची परीक्षा (HSC Board Exam) आज (ता. १०) पासून सुरू झाली. आज पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या परीक्षेत शेवगाव (Shevgoan) तालुक्यातील बोधेगाव केंद्रावर भरारी पथकाने दोन कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.
अवश्य वाचा – राज्याच्या राजकारणात ठिणगी; मोहन भागवतांच्या आरोपांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर

शिक्षण विभागाने नियोजन (HSC Board Exam)
बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवार (ता.१०) पासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात ६२ हजार ४६२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी ११६ परीक्षा केंद्र सज्ज परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली. आज पहिल्याच पेपरला एक हजार १४३ विद्यार्थी गैरहजर होते. तर ६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
हेही वाचा – आत्मविश्वास सातासमुद्रापार नेऊ शकतो: काळे
दोन कॉपी बहाद्दर पकडले (HSC Board Exam)
प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात पहिल्याच पेपरला भरारी पथकाने दोन कॉपी बहाद्दर पकडले आहेत. प्रशासनाने सीसीटीव्ही, ड्रोन, भरारी पथके अशा अनेक उपाययोजना राबविल्या होत्या. मात्र, तरीही शेवगाव तालुक्यातील बोधेगाव केंद्रावर पहिल्याच पेपरला प्रशासकीय यंत्रेला आव्हान उभे राहिले आहे.
हे पहा – अजितदादांचा अपघात नाही, घातपात! रोहित पवारांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ
बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या संध्या गायकवाड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, योजना शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख, तहसीलदार व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्र स्तरावर दक्षता पथक तैनात आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही बसविण्यात आले आहे. केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी झुम अॅपचा वापर केला जात आहे.



