नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यंदाचा राज्याचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. तसेच, दुपारी १ वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच,उद्यापासून (ता.६) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.
नक्की वाचा :अहिल्यानगरच्या गायिकांनी गायले ‘अभिजात मराठी राजभाषा गौरव गीत’
निकालात यंदाही मुलींचीच बाजी (HSC Results)
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६. ७४ टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल ८९. ४६ टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ८९.५१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे.
अवश्य वाचा : तनिषा भिसेंच्या बाळांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ खांची मदत
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. तर,फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का १.४९ नं घसरला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण :९६. ७४ टक्के
पुणे : ९१.३२ टक्के
कोल्हापूर : ९३. ६४ टक्के
अमरावती : ९१. ४३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२. २४ टक्के
नाशिक : ९१. ३१ टक्के
लातूर : ८९. ४६टक्के
नागपूर : ९०.५२ टक्के
मुंबई : ९२.९३ टक्के
बारावीचा निकाल पाहण्यासाठी रोल नंबर व आईचं नाव आवश्यक (HSC Results)
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिलं नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.