HSRP Number Plate : एचएसआरपी नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; अन्यथा होणार कारवाई

HSRP Number Plate : एचएसआरपी नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; अन्यथा होणार कारवाई

0
HSRP Number Plate : एचएसआरपी नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; अन्यथा होणार कारवाई
HSRP Number Plate : एचएसआरपी नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; अन्यथा होणार कारवाई

HSRP Number Plate : नगर : केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार (Central Motor Vehicle Rules) १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट” (HSRP Number Plate) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी वाहनमालकांना ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer) विनोद सगरे (Vinod Sagere) यांनी दिली आहे.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

अधिकृत संकेतस्थळाचा वापर करवण्याचे आवाहन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २३ फिटमेंट सेंटर कार्यरत आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत १ लाख १० हजार १५७ वाहनांनी आतापर्यंत “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट” बसवून घेतल्या आहेत. वाहनमालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी मोटार वाहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत एचएसआरपी प्लेट न बसवल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनमालकांनी दंडाची कार्यवाही टाळण्यासाठी आपल्या वाहनावर “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट” तत्काळ बसवून घेण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

वाहनाची अचूक माहितीसह शुल्क भरणे आवश्यक (HSRP Number Plate)

एचएसआरपी बुकींग करिता वाहनाची अचूक व योग्य माहितीसह विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच बुकींग करुन ९० दिवसांचे आत एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. दुचाकी व ट्रॅक्टरच्या नंबर प्लेट करिता ४५० रुपये शुल्क, तर तीन चाकी वाहनांकरिता ५०० व उर्वरित इतर सर्व वाहनांकरिता ७४५ रुपये आकारण्यात येणार आहे. १५ वर्षांपुढील वाहने असलेल्या वाहनांना रिपासिंग करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर जुनी वाहने रिपासिंग करून एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करावे व कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.