Hubli Encounter:पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार,महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

0
Hubli Encounter:पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार,महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!
Hubli Encounter:पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार,महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

नगर : हुबळीमध्ये (Hubli) पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape Case) झाल्याची घटना घडली आहे. आता या हत्या प्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर (Hubli Encounter) केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे हुबळी शहरात प्रक्षोभ निर्माण झाला होता.

नक्की वाचा : विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 

फौजदार अन्नपूर्णा यांच्याकडून आरोपीचा एन्काऊंटर (Hubli Encounter)


हुबळीमध्ये पाच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर पोलिस स्थानकात दाखल झाली होती. सीसीटीव्ही आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला अटक केली होती. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस त्याला त्याच्या घरी घटनास्थळी घेऊन गेले होते. तेथे रितेश कुमार याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फौजदार अन्नपूर्णा यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली. मात्र तरीही रितेश कुमार पळून जात होता. त्यामुळे फौजदार अन्नपूर्णा यांनी त्याच्या पायावर आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या रितेश कुमार याला उपचारासाठी किम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

अवश्य वाचा : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार

नेमकं काय घडलं ?(Hubli Encounter)

या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आश्वासन देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर नराधमाने तिचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून दिला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर हुबळीत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. अशोक नगर पोलीस ठाण्याबाहेर हजारो संतप्त नागरिकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतर रितेश कुमारला ताब्यात घेण्यात आले होते. रितेश कुमार हा बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. तो हुबळीत कामासाठी वास्तव्याला होता. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला शोधून काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here