Human Skeletons : कोकणकड्याच्या दरीत सापडले दोन मानवी सांगाडे

Human Skeletons : कोकणकड्याच्या दरीत सापडले दोन मानवी सांगाडे

0
Human Skeletons : कोकणकड्याच्या दरीत सापडले दोन मानवी सांगाडे
Human Skeletons : कोकणकड्याच्या दरीत सापडले दोन मानवी सांगाडे

Human Skeletons : अकोले : तालुक्यातील हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याच्या सुमारे १८०० फूट खोल दरीत दोन तरुणांचे सांगाडे (Human Skeletons) सहा महिन्यांनंतर आढळून आले आहेत. एक सांगाडा सहा महिन्यांपूर्वी हरिश्चंद्रगड (Harishchandragad) परिसरात फिरायला आलेल्या बेपत्ता पर्यटक रोहित सोळुंके याचा, तर दुसरा सांगाडा लातूरच्या गणेश उमेश होनराव याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही तरुणांच्या सांगाड्यांची ओळख राजूर आणि टोकावडे पोलिसांना (Police) पटलेली आहे.

नक्की वाचा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

लोणावळा साहसी ट्रेकर्सची कामगिरी

गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली हेमंत जाधव, अरमान मुजावर, धनाजी पनाळे, ओम उगले, आशिष गुंजाळ या रेस्क्यू टीमने ही मोहीम गुरूवारी (ता.१२) फत्ते केली आहे. १८ जून २०२४ ला रोहित श्रीपाद सोळुंके (वय २२, रा. सिल्वासा) हा ट्रेकिंगसाठी कळसूबाई शिखरावर आला होता. तो परत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी राजूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यातच कोकणकड्यावर मान्सून सक्रिय झाला अन् पोलीस व ट्रेकर्सना रोहित सोळुंकेचा शोध घेता आला नाही.

अवश्य वाचा : शेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

दोन दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते (Human Skeletons)

पाऊस उघडल्याने राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी लोणावळा साहसी ट्रेकर्सना मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले. ट्रेकर्सने कोकणकड्यावर येऊन दोन दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते. सुमारे १८०० फूट खोल दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून ट्रेकर्स टीमने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. यावेळी टीमला एक जीर्ण झालेला सांगाडा आढळून आला. या सांगाड्याची जवळून पाहणी करत असताना टीमच्या सदस्यांना गणेश उमेश होनराव या नावाचे आधार व पॅनकार्ड आणि तुटलेली हाडे सापडली.

एकाचा शोध घेताना दुसऱ्याचा मृतदेह हरिश्चंद्रगडावर आढळून आला.

रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरूच ठेवली. आधीच्या सांगाड्यापासून २५ ते ३० मीटर अंतरावर पुन्हा एक सांगाडा मिळून आला. हा सांगाडा रोहित सोळुंके याचा असल्याची खात्री रेस्क्यू टीमने केली. यावेळी विरलेल्या अवस्थेतील टी-शर्ट व त्याच्या शेजारी विस्कटलेली हाडे रेस्क्यू टीमला दिसून आली. दोन्ही सांगाडे रेस्क्यू टीमने वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये बांधून वर आणली.