Hunger strike : ‘जनसंघर्ष’च्या उपोषणाला रुपवते यांनी दिला पाठिंबा

Hunger strike : अकोले : येथील तहसील कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या दुध दर (Milk price) ३४ रुपये प्रतिलिटर मिळावा आणि पशुखाद्याचे दर कमी करावे, यांसह विविध मागण्यांसाठी ‘जनसंघर्ष संघटना’ व दूध उत्पादक शेतकर्‍यांचे  उपोषण (Hunger strike) सुरू आहे.

0
Hunger strike : ‘जनसंघर्ष’च्या उपोषणाला रुपवते यांनी दिला पाठिंबा
Hunger strike : ‘जनसंघर्ष’च्या उपोषणाला रुपवते यांनी दिला पाठिंबा

Hunger strike : अकोले : येथील तहसील कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या दुध दर (Milk price) ३४ रुपये प्रतिलिटर मिळावा आणि पशुखाद्याचे दर कमी करावे, यांसह विविध मागण्यांसाठी ‘जनसंघर्ष संघटना’ व दूध उत्पादक शेतकर्‍यांचे  उपोषण (Hunger strike) सुरू आहे. यास राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश


राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये शासन निर्णय काढून दुधाला ३४ रुपये प्रतिलिटरचा भाव निश्चित केला असूनही, आज दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरामध्ये फक्त २६ ते २७ रुपये प्रतिलिटर हा भाव मिळत आहे. त्यातच पशुखाद्यावर व औषधांवर लागू असलेल्या जीएसटीमुळे त्याचे भाव दुप्पट झाले आहेत. कमी पावसामुळे आज शेतीची अवस्था, दुष्काळाची परिस्थिती व शेतमालाला मिळणारा भाव यांचे सगळेच गणित कोलमडलेले असताना दूध उत्पादनाला शेतीचा जोडधंदा म्हणून शेतकरी आशेच्या नजरेने बघत आहे.

नक्की वाचा : विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर त्रिसूत्री कारवाई

या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने लवकरात लवकर यावर सकारात्मक हस्तक्षेप करून जुलै महिन्यात काढलेल्या शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी यासाठी हे उपोषणकर्ते आग्रही आहेत. त्यांच्या या उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असून, उत्कर्षा रुपवते यांनीही भेट घेत चर्चा केली आणि पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here