hunger strike : अकोलेतील आमरण उपोषणाची धार अधिक तीव्र होणार

hunger strike : अकोले: दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) अकोले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास (hunger strike) बसले आहेत.

0
hunger strike : अकोलेतील आमरण उपोषणाची धार अधिक तीव्र होणार
hunger strike : अकोलेतील आमरण उपोषणाची धार अधिक तीव्र होणार

hunger strike : अकोले: दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) अकोले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास (hunger strike) बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष करत असल्याने संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या उपोषणात रविवारपासून (ता.26) बेमुदत अन्नत्याग करत शेतकरी नेते डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) सहभागी झाले असल्याने उपोषणाची धार अधिक तीव्र होणार आहे.

हे देखील वाचा : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन


दुधाचे दर कोसळल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास 22 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. दरम्यान, अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा, असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास  शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

नक्की वाचा : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा ‘वन नेशन-वन क्यू आर कोड’


दुधाला 34 रुपये भाव जोपर्यंत मिळत नाही व दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे. या उपोषणात मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालुंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, नीलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी दूध उत्पादक सहभागी झालले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here