Hunger Strike : कर्जत : बारडगाव सुद्रीक (ता.कर्जत) दलित स्मशानभूमीतील (Cemetery) अतिक्रमण तत्काळ काढावे. यासह सदरच्या स्मशानभूमीस ग्रामपंचायतीमार्फत कंपाऊंड करावे या मागणीसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्यासह बारडगावच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले. यावेळी नायब तहसीलदार (Tehsildar) प्रकाश बुरुंगले, विस्तार अधिकारी रुपचंद जगताप, परमेश्वर सुद्रीक, गुप्तचर विभागाचे महादेव कोहक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली.
नक्की वाचा: नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून
अनेकवेळा तक्रारी करूनही दाखल नाही
बारडगाव सुद्रिक (ता.कर्जत) येथील पिढ्यानपिढ्या असलेली दलित समाजाची स्मशान भूमी ११ गुठ्यांत आहे. अनेक वर्षांपासून सदरच्या जागेवरच दलित समाज बांधवाचा अत्यंविधी बौद्ध धर्माच्या संस्कारातून त्याच ठिकाणी होत आहे. मात्र, दलित समाजाच्या ताब्यात असलेल्या गट नंबर १७३ व जुना सर्वे नंबर १ मधील ११ गुंठ्यातील काही भागात बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले. याबाबत सर्व समाज बांधवानी वेळोवेळी अनधिकृत अतिक्रमणाची तक्रार संबंधित गावपातळीवरील अधिकारी यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती. मात्र, यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने सोमवारी (ता.१) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. वास्तविक पाहता सदरची जागा मोजणीसाठी दोन वर्षांपूर्वी रक्कम भरली असताना आजमितीस भूमी अभिलेख कार्यालयाने ती मोजणी केली नाही. ग्रामसेवकास वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा केला. मात्र त्याने देखील शासकीय पातळीवर काहीच दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामसेवक लालासाहेब मोहिते यांनी उपोषणाचे पत्र दिल्यावर देखील तालुका प्रशासनास का कळविले नाही ? कोणाच्या दबावाखाली ते काम करीत आहे का ? याचा जाब विचारला असता ग्रामसेवक मोहितेंना तालुका पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी देखील धारेवर धरले. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी पंचायत समिती प्रशासन आणि उपोषणकर्त्यात यशस्वी मध्यस्थी करीत समाधान करण्याचा प्रयत्न केला.
अवश्य वाचा: ‘आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री’- संभाजी भिडे
आंदोलनात सहभाग (Hunger Strike)
यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, नानासाहेब साबळे, सुनील शेलार, रघुआबा काळदाते, अँड. दत्तात्रय चव्हाण, कुलदीप गंगावणे, अशोक जाधव, अक्षय भवर, मुकेश गायकवाड, विलास ठोकळे, बलभीम गायकवाड, अमोल साबळे, चंद्रकांत पवळ, सुरेश गायकवाड, कचरू साबळे, रानुजी साबळे, विनायक गायकवाड, सोनबा साबळे, बापू कांबळे, सुरज गायकवाड, राजेश गायकवाड, उत्तम गायकवाड, मकाजी साबळे, योगेश गायकवाड, धनंजय कांबळे, राहुल गाडे, विवेक धाकतोडे आदी सहभागी झाले होते