Hunger Strike : पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी येथे अंगणवाडी मदतनीस व इतर पदभरती प्रक्रियेत (Recruitment process) गैरव्यवह झाल्याचा आरोप करत याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई (Action) करावी. झालेली भरती रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी करत एकनाथवाडी येथील भाग्यश्री रामदास खेडकर, रामदास सुदाम खेडकर, सुदाम नामदेव खेडकर यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे.
अवश्य वाचा: आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका
नव्याने भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी (Hunger Strike)
सोमवारपासून सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप कुठलाही तोडगा निघू शकला नाही. याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाग्यश्री रामदास खेडकर या अपंग उमेदवार असतानाही त्यांचा कुठलाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आलेला नाही. नियम डावलून भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. झालेली भरती प्रक्रियानियमबाह्य होऊन त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे भाग्यश्री खेडकर यांच्यावर अन्याय होत असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवरवर कारवाई करावी व भारतीय प्रक्रिया रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.