Hunger Strike : ”सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या”

Hunger Strike : ''सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या''

0
Hunger Strike : ''सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या''
Hunger Strike : ''सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या''

Hunger Strike : श्रीरामपूर: राज्य सरकारने (State Govt) सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी औसा (जि.लातूर) येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे उपोषण (Hunger Strike) चालू आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी येथील सोयाबिन खरेदी (Buy soybeans) बंद ठेवावी, अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे बाजार समितीमध्ये दिलेल्या निवेदनात केली आहे.

नक्की वाचा: मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

निवेदनात म्हटले आहे की, (Hunger Strike)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला केंद्र सरकारने ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सोयाबीनला ८५०० रुपये हमीभाव घावा, तरच शेतकऱ्यांना परवडणारा आहे. कारण उत्पन्नापेक्षा सोयाबीन पेरणी व काढणी खर्च जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने ८५०० रुपये भाव देण्यात यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी औसा (जि.लातूर) येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे चालू असलेल्या उपोषणास आम्ही जाहीर पाठींबा देत आहोत.

अवश्य वाचा: मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात’या’जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज

तीव्र आंदोलनाचा इशारा (Hunger Strike)

या आंदोलनास पाठिंबा म्हणून १ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी उतपन्न बाजार समिती श्रीरामपूर, उपबाजार, टाकळीभान, उपबाजार बेलापूर, या ठिकाणची सोयाबीनची खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवून अखिल भारतीय छावा संघटनेच्या आंदोलनास सहभागी व्हावे. तसेच आज रोजी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबिनची खरेदी होत आहे. त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी, अन्यथा श्रीरामपूरसह राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.


निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाबळे व संचालक राजेंद्र पाउलबुद्धे यांनी स्वीकारले. जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, प्रवीण देवकर, सचिन गवळी, अक्षय पटारे, अनिल उंडे, सुधीर खपके, अरुण पाटोळे, शरद बोंबले, हेमंत मोहिते, गोरख शेजुळ आदी उपस्थित होते.