Hygiene first : नगर : आरोग्यदायी खाद्यपदार्थ (Healthy foods) बनविताना शुद्धता व स्वच्छतेची काळजी घेतल्यास अनेक आजारांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. या संकल्पनेतून अहमदनगर शहरात सुरू झालेली हायजिन फर्स्ट (Hygiene first) ही चळवळ भविष्यात अधिक व्यापक होऊन राज्य व देश पातळीवर पोहोचावी, खाद्यपदार्थ बनवताना तेथील किचन व परिसर स्वच्छ असावा. आरोग्यदायी आहारामुळे अनेक आजारांपासून आपल्याला दूर राहता येते. आपण पैसे देऊन विकत घेतलेले खाद्यपदार्थ हे आरोग्यदायी असावेत या संकल्पनेतून आठ वर्षांपूर्वी वैशाली गांधी यांनी हायजिन फर्स्ट या चळवळीचा प्रारंभ केला. ही नावीन्यपूर्ण संकल्पना विशेष कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन सुहाना प्रवीण मसालेवालेचे (Suhana – Pravin Masalewale) संचालक व दि इको फॅक्टरी फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद चोरडिया (Anand Chordia) यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा: जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’- एकनाथ शिंदे
मनपा, हायजिन फर्स्ट आणि आय लव्ह नगरच्या वतीने आयोजन (Hygiene first)
हायजिन फर्स्ट या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व मनपा व हायजिन फर्स्ट आणि आय लव्ह नगर तर्फे आयोजित किचन स्वच्छता स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद चोरडिया बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उपायुक्त सचिन बांगर, हायजिन फर्स्टच्या संचालिका वैशाली गांधी, महापालिकेचे आस्थापना विभाग मेहेर लहारे, अनुराधा रेखी, दीपाली चुत्तर, डॉ,आश्लेषा भंडारकर, गिरीश कुकरेजा, वैशाली मुनोत, आरती गिरवले, सागर शर्मा, बाबासाहेब शिंदे, ईश्वर बोरा, डॉ, रोहित गांधी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका
स्वच्छ किचनकडून आरोग्याकडे नेण्याचे कार्य (Hygiene first)
आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. ते काम वैशाली गांधी यांनी केले असल्यामुळेच त्या आज आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेचे धडे देत जनजागृती करण्याचे काम केले आहे. आपले शहर निरोगी रहावे यासाठी स्वच्छ व शुद्ध अन्नाची गरज असते. त्या माध्यमातून नगरकरांसाठी भविष्यात आणखी प्रगती करून समाजाला स्वच्छ किचनकडून आरोग्याकडे नेण्याचे कार्य सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आजवर नगर शहरातून अनेक चांगल्या संकल्पना राज्य पातळीवर गेलेल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वानीच केले आहे त्यातीलच एक भाग म्हणून हायजीन फर्स्ट ही नगर शहरात सुरू झालेली संकल्पना लवकरच राज्य पातळीवर नावलौकिक मिळवेल, असे सांगत हायजीन फर्स्ट टीमच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या कार्याचे व परिश्रमाबद्दल कौतुक केले.
वैशाली गांधी म्हणाल्या की, शहरातील हॉटेल्स, हातगाड्या, बेकरी, विद्यार्थी वसतीगृहे, फूड स्टॉल्स यांचे किचन व परिसर स्वच्छ असावा. त्याकरिता एक व्यापक मोहीम हायजिन फर्स्ट ने हाती घेतली. स्वच्छ किचन कडून आरोग्याकडे ही संकल्पना राबविताना त्यामध्ये हॉटेल्स, फूड स्टॉल्स येथील पिण्याच्या पाण्यापासून ते अन्नपदार्थ वाढणाऱ्या कामगाराच्या नखांपर्यंत स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी, त्याचबरोबर संपूर्ण परिसर कसा स्वच्छ ठेवावा याबाबत सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सूचना करण्यात आल्या.अनेकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हायजीन फर्स्ट चळवळ गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असल्याचे चळवळीच्या मुख्य प्रणेत्या वैशाली गांधी यांनी यावेळी सांगितले. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आय लव नगरचे संस्थापक व उद्योजक नरेंद्र फिरोदिया, शहराचे आ. संग्राम जगताप व महापालिका प्रशासन व हायजिन फर्स्टच्या सर्व टीमचे अनमोल सहकार्य मिळत असल्याचे वैशाली गांधी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अहमदनगर शहरातील स्वच्छ किचन असलेल्या हॉटेल्स, फूड स्टॉल्स, बेकरी व हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा देखील हायजीन फर्स्ट संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हायजिन फर्स्टचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.संस्थेने स्वच्छ किचन संकल्पनेबाबत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.