महिलांनी घेतला विविध कार्यक्रमांचा आनंद
I love Nagar : नगर : जागतिक महिला दिनाचे (women’s day) औचित्य साधत नगर शहरातील लोकप्रिय संस्था असलेल्या ‘आय लव्ह नगर’ने (I love Nagar) महिलांसाठी आगळ्या वेगळ्या माहितीपर व मनोरंजनपर ‘आय लव्ह नगर किचन क्वीन’ या कार्यक्रमाचे काल (रविवारी) आयोजन केले होते. या पाककला स्पर्धेत नगर जिल्ह्यातील महिलांनी विविध राज्याचे पारंपरिक पदार्थ बनवून आपली पाककला सादर केली. यामध्ये रेणुका जिंदम यांनी तयार केलेल्या ‘पप्पू अन्नम’ ही रेसिपी सर्वोत्कृष्ट ठरली. जिंदम यांना ‘आय लव्ह नगर किचन क्वीन २०२४’चा बहुमान अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) व शेफ दीपा चंदे (Deepa Chande) यांच्या हस्ते देण्यात आला.
हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही
स्पर्धकांनी बनविले राज्यांतील पारंपरिक शाकाहारी पदार्थ (I love Nagar)
या कार्यक्रमांचे नगर शहरातील नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी राज्यांतील पारंपरिक शाकाहारी पदार्थ तयार करून आणले होते. हे पदार्थ त्यांनी फुले, फळे व आकर्षक वस्तूंच्या सहाय्याने सजवली होती. ‘आयरिस प्रीमियर’ हॉटेलचे हेड शेफ बलवंत सिंह व शेफ दीपा चंदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत ८२ वर्षांच्या आजींपासून १८ वर्षांच्या तरुणीपर्यंत अनेक महिलांनी सहभाग घेतला.
लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका
महिलांसाठी विविध मनोरंजनपर खेळ (I love Nagar)
या शिवाय महिलांसाठी विविध मनोरंजनपर खेळ, लकी ड्रॉ, नृत्य, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आदी कार्यक्रम झाले. यात महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक ‘जय जलाराम फूड प्रॉडक्टस’, को-पॉवर्ड ‘श्री समर्थ शंकर ज्वेलर्स’ होते. तर डेकोरेशन पार्टनर ‘पटवेकर डेकोरेटर्स’, व्हेन्यू पार्टनर ‘नंदनवन लॉन’, को-स्पॉन्सर ‘कुंश मसाले’, गिफ्ट पार्टनर ‘ओस्तवाल किचन’, रेडिओ पार्टनर ‘रेडिओ सीटी ९१.१’, एंटरटेन्मेंट पार्टनर ‘ॲफॉस्ट्रॉफी डान्स ॲकॅडमी’, मीडिया पार्टनर ‘दैनिक समाचार’ होते.
उत्कर्षा बोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आय लव्ह नगरच्या प्रमुख विशाखा पितळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘आय लव्ह नगर’च्या टीमने परिश्रम घेतले.
स्पर्धेतील बक्षीस विजेते
उत्कृष्ट सजावट
प्रथम – अलका शिंदे
द्वितीय – दीपिका चोरडिया
सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा
प्रथम – राणू गोयल
द्वितीय – धनश्री धोपावकर
आय लव्ह नगर किचन क्वीन किताब
प्रथम – रेणुका जिंदम
द्वितीय – वेदिका गोडळकर, उज्ज्वला आभाणे
तृतीय – सरला मालपाणी, अभिनेत्री चंगेडिया
उत्तेजनार्थ – कल्याणी हिंगे, भावना मेहेर