I Love Nagar : नगरकरांनो साधा ऐतिहासिक नगरशी संवाद; ‘आय लव्ह नगर’चा अनोखा उपक्रम

I Love Nagar | नगर : नगर शहराचा मानबिंदू ठरणारी 'आय लव्ह नगर' (I Love Nagar) ही संस्था नगरकरांत स्वतःच्या शहराबाबत अभिमान निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते.

0
I Love Nagar
I Love Nagar

I Love Nagar | नगर : ऐतिहासिक नगर (Ahmednagar) शहराचा मानबिंदू ठरणारी ‘आय लव्ह नगर’ (I Love Nagar) ही संस्था नगरकरांत स्वतःच्या शहराबाबत अभिमान निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. या ऐतिहासिक नगर शहराच्या स्थापनेला २८ मे रोजी ५३४ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त ‘आय लव्ह नगर’ने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नगरकरांना दूरध्वनीच्या माध्यमातून ऐतिहासिक नगरशी संवाद साधण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. या उपक्रमात नगरकरांना सहभागी होता येणार आहे.

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले

कॉईन बॉक्सवरून संवाद (I Love Nagar)

नगर शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे या शहराशी भावनिक नाते तयार झाले आहे. या शहरातील आठवणी, वास्तू, व्यक्ती, हवामान, स्मारके, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक व सामाजिक चळवळी यांच्याशी तो समरस झाला आहे. शहर सोडून तो बाहेर गेला तरी त्याचा नगर शहराविषयीचा अभिमान तसूभरही कमी होत नाही. तोच अभिमान, शहराविषयीचे आपले नाते दूरध्वनीच्या माध्यमातून नगरकरांना मांडता येणार आहे. काही वर्षांपूर्वी कॉईन बॉक्स हे परस्परांशी संवाद साधण्याचे वेगवान माध्यम होते. याच कॉईन बॉक्सचा प्रतीकात्मक स्वरुपात वापर करून नगरकरांना ऐतिहासिक नगरशी संवाद साधायचा आहे.

हेही पहा : डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी उलगडून सांगितली नारदीय कीर्तनाची परंपरा

या ठिकाणी होणार उपक्रम (I Love Nagar)

हा उपक्रम नगर शहरात शनिवारी (ता. २५) प्रोफेसर चौक, रविवारी (ता. २६) माळीवाडा, सोमवारी (ता. २७) दिल्ली गेट, मंगळवारी (ता. २८) प्रोफेसर चौक येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे. तरी नगरकरांनी नगर शहराविषयी असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आय लव्ह नगर’तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here