नगर : तेलंगणामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. तेलंगणात (Telangana) भारतीय हवाई दलाचे (IAF) प्रशिक्षणार्थी विमा (IAF Trainer Aircraft) कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी विमानात एक ट्रेनर पायलट आणि एक ट्रेनी पायलट होते.
नक्की वाचा : चीनमधल्या श्वसनविकाराचा धसका; आरोग्य विभागाकडून खबरदारीचे पाऊल
हैदराबादमध्ये आज (ता.४) डिसेंबरला वायुसेनेच्या विमानाचा अपघात झाल्याची दुःखद घटना घडली आहे. खुद्द हवाई दलाने ही माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ८. ५५ वाजता तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमध्ये पिलाटस प्रशिक्षण विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात हवाई दलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता, तर दुसरा हवाई दलाचा कॅडेट होता. अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झालं. या अपघातानंतरचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये विमान जळताना दिसत आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ ची तारीख आली समोर
पिलाटस हे एक लहान विमान आहे, जे हवाई दल आपल्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरलं जातं. हेच विमान सोमवारी सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघाले होतं, पण वाटेत या विमानाचा अपघात झाला. तेलंगणामध्ये झालेल्या विमान अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघाताचे कारण अजून समोर आलेलं नाही. हे कारण समोर येण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.