IAS Pooja Khedkar: पूजा खेडकराला नगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र?;जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले नोंदीचे वास्तव

खेडकर हिला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे.

0
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकराला नगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र?;जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले नोंदीचे वास्तव
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकराला नगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र?;जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले नोंदीचे वास्तव

नगर : राज्यात चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर हिला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून (Nagar Civil Hospital) दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे नगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. त्यामुळे आता पूजा खेडकरचे वादग्रस्त दिव्यांग प्रमाणपत्र नगरमधून दिल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

नक्की वाचा : गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा!

डॉ. घोगरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र २०२१ मध्ये देण्यात आले होते. तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्ताऐवज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या आहेत.

पूजा खेडकरला वर्तन नडले ? (IAS Pooja Khedkar)

पूजा खेडकरचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. मात्र, मागील काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.

अवश्य वाचा : ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ गाण्यात झळकला बालकलाकार साईराज केंद्रे

पूजा खेडकरच्या नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा देखील वाद? (IAS Pooja Khedkar)

पूजा खेडकरने युपीएससी नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देखील जोडले होते. मात्र, पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती ४० कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्याचा ओबीसी नॉन क्रीमी लेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा आरोप करत काही जणांनी माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागविली आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. मात्र, सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here