नगर : क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं वेळापत्रक (ICC Champions Trophy 2025 Schedule) जाहीर केलं आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.आयसीसीने यापूर्वीच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवणार असल्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची (Karachi) येथे होणार आहे. तर बहुप्रतिक्षित असा भारत-पाकिस्तान सामना (Bharat Pakistan Match) २३ फेब्रुवारीला होणार आहे.
नक्की वाचा : अनधिकृत फ्लेक्सवर मनपाचा कारवाईचा बडगा; १२ जणांवर गुन्हा दाखल
भारत आणि पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार (Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. फायनल ९ मार्च रोजी होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. तर यजमान पाकिस्तानमधील रावलपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत.
अवश्य वाचा : केंद्र पुरस्कृत योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यावर भर द्या : भाऊसाहेब वाकचौरे
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही.गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुमारे महिनाभराचा उशीर झाला आहे. आता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळण्यास सहमती दिल्यानंतर आयसीसीनेही वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक (Champions Trophy 2025)
१९ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२१ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी-पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२४ फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
२६ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
२७ फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
२८ फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
१ मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
२ मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च- उपांत्य फेरी १, दुबई
५ मार्च- उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई.