ICC New Rule: आयसीसीचा नवा नियम ; गोलंदाजांनाही ‘टाईमआउट’

आयसीसीने गोलंदाजांसाठीही टाईमआउट सारखा नवा नियम आणला आहे. खेळाचा वेग वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे

0
आयसीसीचा नवा नियम ; गोलंदाजांनाही 'टाईमआउट'

नगर : वर्ल्डकप २०२३ (World Cup 2023) पार पडल्यानंतर आयसीसीने क्रिकेटचे नियम (ICC New Rule) बदलले आहेत. आयसीसीने गोलंदाजांसाठीही टाईमआउट (Timeout Rules for Bowlers) सारखा नवा नियम आणला आहे. खेळाचा वेग वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.आतापर्यंत फलंदाजांसाठी जसा टाईम आउट नियम लागू होतो, तसाच नवा नियम आता गोलंदाजांसाठी असणार आहे. या नियमामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

नव्या नियमानुसार, आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला  एक ओव्हर संपल्यानंतर पुढचा गोलंदाज ६० सेकंदात म्हणजेच, एका मिनिटांत पुढील ओव्हर टाकण्यास तयार असला पाहिजे. जर असं झालं नाही, तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वन डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये लागू असणार आहे. नियमांनुसार, दोन षटकांमधील वेळ मोजण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. सुरुवातीला हा नियम चाचणीसाठी लागू करण्यात येणार असून त्याचाफायदा आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू करण्यात येईल.

अवश्य वाचा :  राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार   

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर बंधने घालण्याची पद्धतही आयसीसीने बदलली आहे. खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंगच्या नियमांमध्येही बदलांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये खेळपट्ट्यांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाते हे निकष सोपे करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here