ICC Rules: आयसीसीचा कसोटी क्रिकेटमधील कपड्यांचा नियम काय ? नियम मोडल्यास शिक्षा काय ?

0
ICC Rules: आयसीसीचा कसोटी क्रिकेटमधील कपड्यांचा नियम काय ? नियम मोडल्यास शिक्षा काय ?
ICC Rules: आयसीसीचा कसोटी क्रिकेटमधील कपड्यांचा नियम काय ? नियम मोडल्यास शिक्षा काय ?

नगर : भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने (Shubhman Gill) दमदार शतक झळकावत दणक्यात सुरूवात केली आहे. मात्र या सामन्यात शुबमन गिलने आयसीसीच्या मोठ्या नियमाचं उल्लंघन (Violation of ICC rules) केलं आहे. त्यामुळे कर्णधार शुभमन गिल आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गिल पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना काळे मोजे घालून मैदानात उतरला होता. मात्र हे आयसीसीच्या नियमाबाहेर आहे. आता आयसीसीचा हा नियम (ICC Rules) काय आहे हे जाणून घेऊयात …

नक्की वाचा :  आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेदार सुरुवात  

काय आहे आयसीसीचा नियम ?(ICC Rules)

आयसीसीच्या नियम १९.४५ अनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू पांढऱ्या, क्रीम आणि राखाडी रंगाचे मोजे घालून मैदानावर उतरू शकतो. पण तो काळ्या रंगाचे मोजे घालू शकत नाही. मात्र शुबमन गिल काळ्या रंगाचे मोजे घालूनच खेळायला उतरला होता. जे आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यासारखं आहे. हा नियम मे २०२३ मध्ये लागू करण्यात आला होता.

या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल शुबमन गिलला त्याच्या सामन्याच्या फीच्या सुमारे १० ते २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. पण, जर गिलने अनावधाने काळे मोजे घातले असतील किंवा त्याचे पांढरे मोजे ओले असल्याने त्याने असं केलं असेल, तर तो दंडातून वाचू शकतो. परंतु हा निर्णय मॅच रेफरीवर अवलंबून आहे. गिल व्यतिरिक्त, इतर अनेक खेळाडूंनी ड्रेस कोडचे उल्लंघन केले आहे.

अवश्य वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली  

आयसीसीच्या नियमाच्या उल्लंघनासाठी कोणाला मिळाली शिक्षा ?(ICC Rules)

२०१८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, केएल राहुलने आयसीसीच्या नियमांचे पालन न करणारे हेल्मेट घातले होते. यासाठी राहुलला त्याच्या मॅच फी च्या १० टक्के दंड भरावा लागला. तर २०१६ मध्ये बिग बॅश लीग दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलने सामन्यादरम्यान काळ्या बॅटचा वापर केला होता, जो आयसीसीच्या नियमांविरुद्ध होता. त्यामुळे गिलला १० टक्के दंड भरावा लागेल असं बोललं जात आहे.