Illegal : नगर : अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या (Taluka Police Station) हद्दीत अरणगाव चौकाजवळ ट्रकमधून अवैधरित्या (Illegal) भंगार वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले (In custody) आहे. त्याच्याकडून सुमारे ८ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
सापळा रचून कारवाईचे आदेश
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ट्रक मधून अवैधरित्या भंगारची वाहतुक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला सापळा रचून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने पथकाने संशयित ट्रक पकडला.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल (Illegal)
या ट्रकमधून सुमारे ३ लाख रूपये किमतीचे लोखंडी पत्रे व विविध प्रकारचे भंगार साहित्य आढळून आले. यामध्ये भंगारासह एकूण ८ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी ट्रक चालक अनिकेत दत्तू साबळे (वय २७, रा. आंधुनी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.