Illegal business : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अवैध मटका व बिंगो व्यवसाय (Illegal business) करणाऱ्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उधारीवर जुगार (Gambling) खेळायला लावून नंतर धमकावून पैशांची वसुली केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मढी (Madhi) येथील एका व्यावसायिकाने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्याच्या मुलाला तिसगाव येथील अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा
धमक्यांमुळे तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मटका व बिंगो या अवैध व्यवसाय करतो. त्याने या तरुणाला जुगाराच्या नादाला लावले. त्यातून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची रक्कम त्या तरुणाकडून उकळण्यात आली. ही रक्कम त्याने घरातून तसेच इतरांकडून उसने घेऊन दिल्याचे समोर आले आहे. मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही संबंधिताकडून आणखी पैशांसाठी दबाव व धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सततच्या धमक्यांमुळे तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली गेला असून, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तरुणाच्या वडिलांना शिवीगाळ (Illegal business)
दरम्यान, ता. १० फेब्रुवारी तिसगाव चौकात झालेल्या वादाच्या घटनेत नजीम सय्यद याने “आमच्या धंद्यात हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत तरुणाच्या वडिलांना शिवीगाळ केल्याची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी विविध कलमांन्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



