Illegal Gas Refilling : नगर : नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या घरगुती एलपीजी गॅसच्या अवैध रिफिलिंग (Illegal Gas Refilling) व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई करत तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीत दोन ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून ६६ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
१९ हजार ६०० रूपयांचे साहित्य जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले यांना माहिती मिळाली. कोठला परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये रजा अकिल शेख (वय २०) हा घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा अवैध साठा करून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती होती. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या आदेशानुसार पंचांसह तत्काळ छापा टाकण्यात आला. घरगुती गॅस वापराचे रिकामे व भरलेले सिलिंडर, गॅस भरण्याचे मशीन, वजनकाटा, बॅटरी असा १९ हजार ६०० रूपये किमतीचे साहित्य आढळून आले. याबाबत रजा शेख विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
४६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Gas Refilling)
तर दुसरी कारवाई एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नवनागापूर परिसरात गॅस रिफिलिंग केंद्रावर छापा टाकण्यात आला. भरलेले सिलिंडर, गॅस भरण्याचे मशीन, वजनकाटा, बॅटरी असा एकूण ४६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल असा एकूण ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे. याबाबत हर्षद ज्ञानदेव भागवत (वय २१, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



