Illegal Gas Refilling Center : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तिघे जेरबंद, ३३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Gas Refilling Center : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तिघे जेरबंद, ३३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

Illegal Gas Refilling Center : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग (Illegal Gas Refilling Center) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ३३ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात करण्यात आली आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे

प्रवीण नारायण खडके (वय- २८, रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर), वैभव आंबादास पवार (वय-४७,रा. सांडवा ता. जि. अहिल्यानगर), गणेश पद्माकर भोसले (वय- ३७, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून २५, लाख १० हजार रुपये किमतीचे वाहने, ८ लाख ३१ हजार ७०० रुपयांचे गॅस टाक्या,तसेच गॅस रिफिलिंग करण्यासाठी लागणारी मशीन,वजन काटा असा एकूण 33 लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Illegal Gas Refilling Center)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालुगडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.