
Illegal Gas Refilling Center : नगर : घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर पणे वाहनांमध्ये गॅस रिफीलिंग (Illegal Gas Refilling Center) करणाऱ्या सेंटरवर पुरवठा विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात ५४ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
अवैध गॅस रिफिलिंगची खात्रीशीर माहिती
अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळील रॉयल ग्लास वर्क च्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये अवैध गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्रीशीर माहिती शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तेजस बाबूलाल पाटील यांना मिळाली.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
पथकाची चाहूल लागताच आरोपी पसार (Illegal Gas Refilling Center)
त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. मात्र, या पथकाची चाहूल लागताच सेंटर चालक तेथून पसार झाला. या पथकाला त्या ठिकाणी ७ रिकामे गॅस सिलेंडर, वजन काटा, रिफिलिंग मशीन, नोझल असा मुद्देमाल आढळून आला, याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


