Illegal liquor : कोतूळमध्ये अवैध दारू पकडली; 5 लाख 74 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Illegal liquor : कोतूळमध्ये अवैध दारू पकडली; 5 लाख 74 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

0
Illegal liquor
Illegal liquor : कोतूळमध्ये अवैध दारू पकडली; 5 लाख 74 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Illegal liquor : अकोले : तालुक्यातील कोतूळ येथे अवैधरित्या दारूतस्करी (Illegal liquor) करणाऱ्या दोन आरोपींना (Accused) पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 5 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हे देखील वाचा: नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अवैध दारू आणि मटका व्यवसाय चर्चेत

गेल्या अनेक महिन्यांपासून कोतूळ येथील अवैध दारू आणि मटका व्यवसाय चर्चेत आहे. अकोलेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी या अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून गुरुवारी (ता.११) सकाळी मोठी कारवाई केली. कोतूळ येथील मोडकळीस आलेल्या शासकीय विश्रामगृह येथे काळ्या काचा असलेली सफेद रंगाची गाडी आली असता पोलीस हवालदार अनिल जाधव यांनी पाळत ठेवून पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना कळवले. त्यानंतर तातडीने गाडीची झडती घेतली असता गाडीत 33 हजार 600 रुपयांचे देशी दारूचे दहा बॉक्स व ४० हजार रुपयांची रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात जप्त आहे.

नक्की वाचा: आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला

पोलिसांची कारवाई (Illegal liquor)

ही दारू कोतूळ येथील अवैध दारू अड्ड्यावर विक्रीसाठी आली होती. गाडी चालक आशुतोष बाळू गुंजाळ (रा.गुंजाळवाडी संगमनेर), अक्षय मारुती वाकचौरे (रा.परखतपूर, ता. अकोले) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दिली. उपनिरीक्षक बाजीराव गवारी यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here