Illegal liquor : अकोले : तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये अवैध दारु (Illegal liquor), मटका याबाबत ऐनवेळेच्या विषयात उपसरपंच संतोष बनसोडे यांनी कडक कारवाई करण्याचा ठराव मांडताच उपस्थित सरपंच पुष्पा निगळे यांच्या नेतृत्वाखाली 17 सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी आक्रमक भूमिका घेत पायी जाऊन थेट सर्व अवैध दारु विक्री करणार्या दुकानांची झाडाझडती घेत आपला संताप व्यक्त केला. यापुढे दारु विक्री करताना आढळले तर नळ व वीज जोडणी तोडण्याचा इशारा (Warning) दिला. त्यानंतर राजूर पोलीस (Police) ठाण्यावर मोर्चा वळवून अवैध धंदे बंद करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच निगळे यांनी दिला.
नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल
न्यायालय, मंदिर, शाळेच्या आवारात दारु विक्री
सप्टेंबर 2005 मध्ये राजूर ग्रामस्थ व ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली दारुबंदीचा ठराव घेऊन अधिकृत सहा दुकाने सरकारने बंद केली. मात्र, काही वर्षानंतर अवैधरित्या दारु विक्री सुरू झाली. अलिकडे तिचा इतका अतिरेक झाला की, न्यायालय, मंदिर, शाळेच्या आवारात मध्यवस्तीत राजरोस दारु विक्री होऊ लागली. त्यात ही दारु सिन्नर येथून बनावट येत असल्याने काही तरुणांस आपला जीव गमवावा लागला तर काहींचा अपघात होऊन त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे राजूर महिला व संघटना यांनी आक्रमक होत ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देत न्यायालय व कन्या शाळेच्या आवारात राजरोस दारु विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल
अवैध व्यवसाय करणार्यांचे तडीपारीचे प्रस्ताव (Illegal liquor)
काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख यांनीही अवैध वाहतूक करणार्या वाहनांना पकडून देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे राजूर पोलिसांनी कडक उपाययोजना करत दारु, मटका बंद केल्याने रिकाम्या बाटल्या सोडून काहीच मिळाले नाही. गावात चार दुकाने तपासली व तेथून हे सर्वजण राजूर पोलीस ठाण्यामध्ये गेले. सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पदाधिकारी व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून कडक कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच अवैध व्यवसाय करणार्यांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले जाईल, असे सांगितले. सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गणपत देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, शेखर वालझाडे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मैड, विमल भांगरे, संगीता जाधव, संगीता मोहंडुळे, लता सोनवणे, अतुल पवार, रामा मुतडक, राम बांगर, प्रमोद देशमुख, विमल पवार, देवराम जाधव, गणेश रावते, ग्रामविकास अधिकारी राजीव वर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.