Illegal Liquor Sale : नगर : जामखेड तालुक्यात अवैध दारू विक्री (Illegal Liquor Sale) करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून एक लाख ६८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जामखेड-नान्नज रस्त्यावर अवैध दारू विक्री
तुषार विठ्ठल जगताप (वय,३२, रा. शिवाजीनगर, जामखेड), असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड-नान्नज रस्त्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून ४४ सिलबंद देशी दारु बॉक्स असा एकुण एक लाख ६८ हजार ९६० रूपांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद
उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाची कारवाई (Illegal Liquor Sale)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय, घोडके, शामसुंदर जाधव, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



