Illegal Liquor Sale : कर्जत तालुक्यात अवैध दारू विक्री; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Liquor Sale : कर्जत तालुक्यात अवैध दारू विक्री; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Illegal Liquor Sale : कर्जत तालुक्यात अवैध दारू विक्री; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Illegal Liquor Sale : कर्जत तालुक्यात अवैध दारू विक्री; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Liquor Sale : नगर : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव परिसरात अवैध दारू विक्री (Illegal Liquor Sale) करणाऱ्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात (Mirajgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?

३४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

राहुल परसराम जागीरवार (वय ४०,रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ३४ हजार ७९० रुपयांचा विविध कंपनीच्या देशी, विदेशी दारुच्या बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे भाऊसाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

याबाबत माहिती अशी की, (Illegal Liquor Sale)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील सरकारमान्य देशी दुकानाचे बाजुला असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये एक व्यक्ती अवैध रित्या देशी, विदेशी दारुची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे यांच्या पथकाने केली.