Illegal Mining : नगर : अवैध वाळू उपसा व गौण खनिज उत्खननाबाबत (Illegal Mining) वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर (Hardened Criminal) एमपीडीए किंवा मोक्का (MCOCA) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले.
नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल
संगमनेर येथील प्रशासकीय कामकाजाचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संगमनेर येथील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. तसेच साकुर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मियावाकी प्रकल्प, वनराई बंधारे तसेच प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेची पाहणी केली. याशिवाय कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला आणि निमोण येथील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेला त्यांनी भेट दिली.
अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…
कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना (Illegal Mining)
तसेच शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन रब्बी पिकांची ई-पीक पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक योजनेचे काम मोहीम स्तरावर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



