Illegal Sand Transport : नगर : श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील एकलहरे परिसरात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : पाथर्डीतील निवडणूक चित्र बदलले; १४ अर्ज मागे, तिरंगी लढतीचे संकेत
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आयान शरिफ पठाण (वय-२१, रा.एकलहरे, ता.श्रीरामपूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कुणाल इंगळे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या मालकाची वाहन असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस रमीजराज आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित
संशयित आरोपीस घेतले ताब्यात (Illegal Sand Transport)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाळू वाहतूक आठवाडी एकलहरे (ता. श्रीरामपूर) या रस्त्याने वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक ब्रास वाळू वाहन असा एकूण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, बिरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अत्तार, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.



