Illegal Sand Transport : नगर : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारे दोघे पोलीस (Police) उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २० हजारांच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargaon Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
गुन्हा दाखल दाखल झालेल्या संशयिताचे नाव
गोरख एकनाथ जाधव (वय २२,रा. शहाजापूर ता. कोपरगाव), योगेश संजय कोळपे (रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव), असे गुन्हा दाखल दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
कुंभारी शिवारात आरोपीस घेतले ताब्यात (Illegal Sand Transport)
शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांना मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ते कोळपेवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कुंभारी शिवारात पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. याबाबत १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार इरफान शेख, पोलीस अंमलदार अशोक शिंदे, दत्तात्रय तेलोरे यांच्या पथकाने केली.



