Illegal Sand Transport : नगर : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?
ट्रक्टर व १ ब्रास वाळू हस्तगत
संकेत राम गोरे (वय- १९, रा. कोरडगाव ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रक्टर व १ ब्रास वाळू असा एकूण सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कोरडगाव परिसरातील नाणी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव
पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Illegal Sand Transport)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे. याबाबत पोलीस किशोर आबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



