Illegal Sand Transport : स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Sand Transport : स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
Illegal Sand Transport : स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal Sand Transport : स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Sand Transport : नगर : शेवगाव पाथर्डी (Shevgaon Pathardi) तालुक्यात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ५० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यात (Shevgaon and Pathardi Police Station) वेगवेगळे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा: पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार

गुन्हा दाखल

अनिल साहेबराव लबडे (वय- ५२ रा. तोंडोळी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), भाऊसाहेब आप्पासाहेब काकडे रा.तोंडोळी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर(डंम्पर मालक) (पसार), सचिन विठ्ठल बडे (वय- ३६ रा. येळी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज परसराम बुटे (वय- २० रा. ढोरजळगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सचिन विठ्ठल बडे, वय- ३६ रा. येळी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

सापळा रचून छापा (Illegal Sand Transport)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यात तसेच शेवगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकले असता नदीपात्रातून अवैध वाढ होत असल्याची दिसून आले. त्यानुसार पथकाने कारवाई करून चार जणांवर शेवगाव पोलीस तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग, राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दीपक घाटकर, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, श्यामसुंदर जाधव, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ. बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने केली आहे.