Illegal Sand Transportation : नगर: अहिल्यानगर तालुक्यातील केके रेंज परिसरात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transportation) करणाऱ्यांवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६१ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपी ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे (Santosh Khade) यांच्या पथकाने शनिवारी (ता.१९) पहाटे ही कारवाई केली.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद
कापरी नदीतून अवैध वाळू वाहतूक
सादिक शेख, शुभम पुंड यांच्यासह आणखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यातील नांदगाव येथील असलेल्या के के रेंज परिसरात कापरी नदीतून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार डंपर, आठ ब्रास वाळू, एक दुचाकी असा एकूण ६१ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अवश्य वाचा : ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित
विशेष पोलीस पथकाची कारवाई (Illegal Sand Transportation)
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली.