Import Duty : कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याचा शेवगाव येथे निषेध

Import Duty : कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याचा शेवगाव येथे निषेध

0
Import Duty : कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याचा शेवगाव येथे निषेध
Import Duty : कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याचा शेवगाव येथे निषेध

Import Duty : शेवगाव : केंद्र सरकारने (Central Government) कापसावरील ११ टक्के आयात शुल्क (Import Duty) रद्द केल्यामुळे, भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टेरीफ लावले आहे. मात्र, मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने अमेरिकन (America) कापूस आयातीवरील ११ टक्के असलेली करमाफी केली आहे. त्यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Indian cotton farmers) तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल कमी भावात कापूस विकावा लागणार आहे.

नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाचा निषेध

त्यामुळे अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव येथील क्रांती चौक येथे केंद्र सरकारने आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाचा निषेध करत त्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी

कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित (Import Duty)

त्यावेळी कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड संदीप इथापे, कॉम्रेड भगवानराव गायकवाड, कॉम्रेड बापूराव राशिनकर ,कॉम्रेड बबनराव पवार ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे ,कॉम्रेड दत्तात्रय आरे, कॉम्रेड रामभाऊ लांडे, कॉम्रेड विष्णू गोरे, कॉम्रेड भिवा घोरपडे, कॉम्रेड बाबूलाल सय्यद, कॉम्रेड विठ्ठल उगले आदी व कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.