Imprisoned : कर्जत : तालुक्यातील मिरजगाव शिवारात ११ किलो गांजाची (Cannabis) वाहतूक करताना तीन जणांना मिरजगाव पोलिसांनी अटक केली (Imprisoned). सदरच्या घटनेत एकूण ८७ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सहायक पोलीस (Police) निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुरुवारी (ता.१४) गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की सांगवी (ता.शिरपूर, जि.धुळे) येथून तीनजण अहमदनगरहून रिक्षाने मिरजगाव परिसरात गांजा या आमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने येणार आहेत. सदरच्या माहितीवरून पाटील यांनी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
११ किलो गांजा हस्तगत (Imprisoned)
मिरजगाव बसस्थानक परिसरात उभी असलेल्या रिक्षामध्ये पाठीमागील सीटवर बसलेल्या इसमांच्या पायाजवळ एक काळ्या रंगाची बॅग आणि विमल पान मसाला कापडी पिशवीचा (झोला) आढळून आला. यावेळी पंचासमक्ष उघडून पाहिले असता त्यामध्ये सुमारे ११ किलो ग्रॅम वजनाचा गांजा प्रति किलो ७ हजार रुपयाप्रमाणे व मोबाईल असा एकूण ८७ हजार ३९२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नक्की वाचा : नगरच्या विकासासाठी अजित पवारांनी संग्राम जगतापांना दिले ९४ कोटीचे बंपर गिफ्ट
मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Imprisoned)
वरील तिन्ही इसमाकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अशोक उर्फ बन्सीलाल सिताराम पावरा (वय २३, रा. आंबा, ता.सिरपूर, जि. धुळे), सुनिल सुकलाल पावरा (वय २१, रा.सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि मंगेश भिवाशा पावरा (वय २४, रा. आंबा, ता. शिरपूर, जि.धुळे) अशी नावे सांगितली संबंधित तिन्ही जणांना मिरजगाव पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, सुनील माळशिखरे, शंकर रोकडे, विकास चंदन, गणेश ठोंबरे, दिपक पवार, सुनिल खैरे, गंगाधर अंग्रे, चालक अशोक रक्ताटे यांनी पार पाडली.