Imtiaz Jaleel Attack:एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा;इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

0
Imtiaz Jaleel Attack:एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा;इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
Imtiaz Jaleel Attack:एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा;इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

नगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेळ आलेला असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठी घडामोड घडली आहे. एमआयएमचे (MIM) माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel Attack) यांच्या प्रचार रॅलीवर बायजीपूरा येथे एका गटाने हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे दिसून आलं आहे.

नक्की वाचा:  काँग्रेस अन् एमआयएमसोबत युती खपवून घेणार नाही;देवेंद्र फडणवीसांचा इशारा   

नेमकं काय घडलं ? (Imtiaz Jaleel Attack)

माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपूरा परिसरातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ही रॅली पुढे गेली. मात्र रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. दोन गट समोरासमोर आल्याने यावेळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.यावेळी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप नागरिकांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला आहे.

अवश्य वाचा: ‘दोन्ही पवार कधीच वेगळे नव्हते हे राज्याला आता दिसून येईल’-लक्ष्मण हाके  

जलील यांचे कुणावर आरोप ? (Imtiaz Jaleel Attack)

कलीम कुरेशी नावाचे एक उमेदवार काँग्रेसकडून उभे आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये २२ नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यावेळी देखील असंतोष पसरला होता. त्याचे पडसाद बायजीपुरा येथे पाहायला मिळाले होते. आज झालेल्या राड्यात एक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कलीम कुरेशी हे प्रभाग ९ मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, तर प्रभाग १४ मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.