Imtiyaz Jaleel: इम्तियाज जलील यांना ‘एमएआयएम’कडून उमेदवारी जाहीर

'एमएआयएम' कडून छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'एमएआयएम'चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

0
Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleel

नगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.’एमएआयएम’ कडून छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : टाकळी मानूर दरोड्यातील आरोपी गजाआड

तिरंगी लढत होणार (Imtiyaz Jaleel)

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील या जागेवरुन उमेदवारी देणार आहे. ठाकरे आणि शिंदेंचे उमेदवार अजून ठरलेले नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील  यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिरंगी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतं ? (Imtiyaz Jaleel)

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली. विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना सर्वाधिक ३ लाख ८९  हजार ४२ इतकी मतं लोकांनी दिली होती. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना  २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. याचाच फटका शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना बसला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत ही छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी गेल्या निवडणुकीप्रमाणे मतविभाजन होणार का? आणि या मतविभाजनाचा फायदा जलील यांना होणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here