Rain Alert : पावसाळा संपला असला तरी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस (Heavy Rain) पडला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात गेल्या एक ते दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगला वाढल्याने मुसळधार पावसामुळे येथे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच काल (ता.20) संध्याकाळी नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस झाला. आज राज्यात विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD)वर्तवली आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेला स्थगिती,नवे अर्ज स्वीकारणे झालं बंद
कुठे पडणार पाऊस ?(Rain Alert)
आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अवश्य वाचा : नाऊर येथे चेकपोस्ट; पोलिसांची राहणार करडी नजर
हवामान विभाकडून ‘येलो अलर्ट’ जारी (Rain Alert)
राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना उन्हाचा कडाका देखील जाणवत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. काल सायंकाळी नवी मुंबई यासोबतच नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर,इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने सोयाबीन, भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.