नगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत (Mula Sahakari Sugar Factory) मोठी बातमी समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या (Shankarrao Gadakh) साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस (Notice) बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७ कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र विधानसभेच्या तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी;अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?
‘निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न’- गडाख (Shankarrao Gadakh)
अहिल्यानगरच्या सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शंकरराव गडाख यांनी नुकताच शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यातच केवळ एकाच कारखान्याला ही नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा परिसरात रंगू लागल्या आहेत. तर यामागे राजकरण असल्याचा गडाख यांनी आरोप केला आहे.
अवश्य वाचा : एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
गडाख उद्या कार्यकर्ता मेळावा घेणार (Shankarrao Gadakh)
याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ही शंकरराव गडाख यांनी सांगितले आहे. या कारवाई विरोधात उद्या (ता.२४) शंकरराव गडाख कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यापूर्वी सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचे ते म्हणालेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकलाय. सोबतच बालवडकर यांचे मेहुणे आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या घरी देखील ईडीने धाड टाकली आहे. अशातच आता शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.